कळी उमलली
कळी उमलली कळी उमलली
आनंदाची पहाट झाली
अंगणात सुगंध दरवळाया
एक नाजूक परी अवतरली
हसरी लाजरी गोड बाहुली
दुडू दुडू धावून करेन मस्ती
घरभर धिंगाणा अन गप्पा गाणी
प्रेमाची ती खान भारी
रुसेल रडेल ती खाऊसाठी
हट्टासाठी टाकेल कट्टी
होईल घोडा तिच्यासाठी
पाठीवर घेऊन मरेन फेरी
सर्वांची ती होईल लाडकी
जीवनात माझ्या लक्ष्मि आली
समाधानाची आज दिवाळी
आमच्या घरी तान्हुली जन्मली
-© गणेश पोटफोडे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा