शुक्रवार, ७ मार्च, २०१४

एक सुरुवात

ll श्री गणेशाय नमः II 

     लहानपणापासून अनेक छंद जपले. लेखन, नाण्याचा संग्रह, टपाल तिकिटांचा संग्रह, कात्रणे, भ्रमंती. कालांतराने आवडी प्रमाणे व वेळे प्रमाणे छंद बदलत गेले तरीही मी सगळ्या छंदांना जपण्याचा प्रयत्न केला. तसा मला लेखनाचा छंद अगदी माध्यमिक शाळेपासूनच लागलेला . त्या वेळी काही छान कविता कराव्यात किंवा चांगले निबंध लिहवेत आणि मराठीच्या शिक्षका कडून शाब्बासकी घ्यावी . पण माझी हि साहित्याची लागलेली गोडी फार काळ टिकली नाही. व्यावासाहिक शिक्षणाकडे वळल्यामुळे वाचन व लेखन करणे कमी होत गेले. आज कित्येक वर्षांनी बहिणाबाई च्या 'मन ओढाय ओढाय' कविते प्रंमाणे माझे मन मला परत लेखनाकडे घेऊन आले आहे.
     या ब्लॉगच्या माध्यमातून मी माझ्या कविता, आठवणी, अनुभव आणि निबंध लिहिणार आहे. माझ्या मनातल्या या विचारांना एक स्वतःचे आणि हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. हा माझा प्रामाणिक प्रयत्न आपल्यांना नाक्कीच आवडेल. आपल्या सूचना व प्रतिक्रियांची मी वाट पाहत आहे.

आसुसलेल्या मनाची धडपड हि न्यारी l पाहिलेल्या स्वप्नांना पंख नवे देणारी ll       

वृन्दावून बाहू आलिंगन देण्यास आला l "शब्दगंध" माझ्या अंतरंगात अवतरला ll

२ टिप्पण्या: