गुरुवार, २९ एप्रिल, २०२१

२०२१/ बखर

२०२१/ बखर १२ : सध्याचे प्रचलित मोबाईल फोन
१ फेब्रुवारी २०२१
स्मार्ट फोन ही माणसाची नवीन गरज बनली आहे. त्यामुळे स्मार्ट फोन निर्माण करणाऱ्या कंपन्यामध्ये सध्या खूप स्पर्धा आहे. नवनवीन सुविधा असलेले स्मार्ट फोन एका पाठोपाठ बाजारात येत आहेत. सध्या आय-फोन खूप चर्चेत आहे. आय-फोन असणे हे मोठे प्रतिष्ठेचे समजले जाते.

Apple कंपनीने २३ ऑक्टोबरला आयफोन-१२ हे नवे माॅडेल बाजारात आणले. त्याला टक्कर देण्यासाठी आता सॅमसंग या कोरीयन कंपनीने त्यांचे Samsung Galaxy S21 हे नवे माॅडेल बाजारात आणले आहे.

बाजारात सध्या उपलब्ध असलेली काही माॅडेल आणि किंमती :
१. आयफोन (Apple iPhone)
iPhone 12 Pro Max
iPhone 12
iPhone 12 mini
२. सॅमसंग
Samsung Galaxy S21 5G
Samsung Galaxy S21+ 5G
Samsung Galaxy S21 Ultra 5G
Samsung Galaxy S20 Ultra
Samsung Galaxy S20 FE
Samsung Galaxy Note S20
Samsung Galaxy A72
Samsung Galaxy A52
Samsung Galaxy A32
Samsung Galaxy A21
Samsung Galaxy A10s
३. हुवाई (Huwai)
Huwai Nova 7i
Huwai Nova 7
Huwai Y7A
Huwai Mate 40 Pro
Huwai Mate 30 Pro
४. रिअलमी (Realme)
Realme 7
Realme 7 Pro
Realme 7i
Realme 6
Realme C2
५. विवो (Vivo)
Vivo Y12S
Vivo Y20
Vivo Y51
Vivo Y20s
Vivo V20s
Vivo V20SE
Vivo Y30
६. ओपो (Oppo)
Oppo A73
Oppo A15
Oppo A94
Oppo A93
Oppo Reno 5
Oppo Reno 5 Pro
Oppo Reno 4
Oppo Reno 4 Pro
Oppo Reno 3
Oppo Reno 3 Pro
७. गुगल (Google)
Google Pixel 4a
Google Pixel 3
Google Pixel 5
८. शाओमी (Xiaomi)
Xiaomi Redmi Note 10
Xiaomi Mi 10T 5G
Xiaomi Redmi 9T
Xiaomi POCO X3
●●●

२०२१/ बखर १३ : जमीनदार पांडुरंग
१ फेब्रुवारी २०२१
पंढरपूरच्या विठ्ठलाच्या नावावर महाराष्ट्रातील १५६ गावात जमीनी असून त्यांचे क्षेत्र हे २,३५५ एकर आहे. त्यापैकी १,०२१ एकरावर पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे नाव लागले आहे. या सगळ्या जमीनी भक्तांकडून दान मिळालेल्या आहेत. या तब्यातील जमीनी शेतकऱ्यांना ११ महिन्यांसाठी खंडाने देण्यात येत आहेत. यातून मंदिर समितीस वार्षिक उत्पन्न मिळते.
●●●

२०२१/ बखर १४ : म्यानमारमध्ये बंड
२ फेब्रुवारी २०२१
म्यानमारमच्या लष्कराने उठाव करून सत्ता ताब्यात घेतली. म्यानमारमधील महत्त्वाच्या नेत्या आँग सान स्यू की यांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. लष्काराने देशात एक वर्षासाठी आणीबाणी जाहीर केली आहे. अनेक ठिकाणी सामान्य नागरिकांनी या बंडाविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन केले. पोलिस बळाचा वापर करत असून यात अनेक नागरिक मारले जात आहेत.
●●●

२०२१/ बखर १५ : उत्तराखंडमध्ये तांडव
७ फेब्रुवारी २०२१
उत्तराखंड राज्यातील चमोली जिल्ह्यात नंदादेवी हिमनदीचा काही भाग कोसळल्यामुळे धौली नदीला मोठा पूर आला. या नदीवर बांधण्यात येत असलेल्या विद्युत प्रकल्पातील अनेक कामगार या पुरात वाहून गेले. अचानक आलेला दगडगोडे आणि गाळाचा पुर एवढा भयंकर होता की, क्षणार्धात त्याने सगळे काही उद्ध्वस्त केले.

झालेले नुकसान
१. अनेक कामगारांचा मृत्यू
२. ॠषीगंगा प्रकल्प उद्ध्वस्त
३. पर्यिवरणाचे मोठे नुकसान
४. अनेक पुल वाहुन गेले
५. तपोवन उर्जा प्रकल्पातील बोगद्यात अनेक कामगार अडकले. बोगद्यात प्रचंड गाळ साचल्याने मदत कार्यात अडथळे.
६. अलकनंदा नदीस पुर

●●●

२०२१/ बखर १६ : रुग्ण घटले
८ फेब्रुवारी २०२१
महाराष्ट्रातील सक्रिय कोरोना रुग्णसंख्या घटली आहे. बाधित ९५% रुग्ण बरे झाले असल्यामुळे दिलासा दायक चित्र दिसत आहे. राज्यातील कोरोना मृत्यूदराचे प्रमाण नियंत्रणात आणण्यात यश आले आहे. मृत्यूदर ४.३८ टक्क्यांवरून २.५६ टक्क्यांवर खाली आला आहे.
●●●

२०२१/ बखर १७ : बिटकाॅईनची मुल्यवर्धी
९ फेब्रुवारी २०२१
टेस्ला आणि स्पेस एक्स कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलाॅन मस्क यांनी बिटकाॅन या आभासी चलनात दीड अब्ज डाॅलरची गुंतवणूक केली. या निर्णयामुळे बिटकाॅनची किंमत १५ टक्क्यांनी वाढून ४४ हजार प्रती एक बिटकाॅन झाली आहे. बिटकाॅन हे सर्वाधिक लोकप्रिय आभासी चलन आहे. या आभासी चलनात अनेक मोठ्या कंपन्या गुंतवणूक करत आहेत. तज्ज्ञांच्या मते भविष्यात बिटकाॅइन हेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील चलन असेल.
●●●

२०२१/ बखर १८ : शाळा सुरू
१२ फेब्रुवारी २०२१
जवळपास एक वर्षापासून बंद असलेल्या शाळा महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार पुन्हा सुरू झाल्या आहेत. दिवसागणिक शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळे बरोबरच इतर व्यवस्थापनाच्या सर्व शाळा सुरू झाल्या आहेत.
●●●

२०२१/ बखर १९ : पालखीमार्ग
१३ फेब्रुवारी २०२१
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी या महामार्गासाठी १२ हजार रूपयांची तरतुद केली आहे. पुढील दीड वर्षात हा पालखी मार्ग बनून तयार होईल.
●●●

२०२१/ बखर २०: पथकरसाठी आता फास्टॅग
१४ फेब्रुवारी २०२१
संपूर्ण भारत देशातील टोलनाके दूर करून फास्टॅग प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. प्रत्येक वाहणाच्या पुढच्या काचेवर फास्टॅग चिकटवला जाईल आणि टोल नाक्यांऐवजी टोलगेट उभारले जातील. टोलनाक्यांवर लागणाऱ्या लांबलचक रांगा कमी होतील आणि यामुळे इंधनाची प्रचंड बचत होणार आहे. देशभरात सगळ्या टोलसाठी एकच फास्टॅग लागेल. हे फास्टॅग जीपीएस प्रणाली मार्फत संकलित करण्यात येईल.
●●●

२०२१/ बखर २१: कोरोनाचे ९६% रुग्ण बरे
१५ फेब्रुवारी २०२१
भारत देशाने कोरोना विषाणूवर मात केल्याचे दिसत आहे. देशातील एकूण रुग्णसंख्येपैकी ९६% रुग्ण आता ठणठणीत बरे झाले आहेत.
●●●

२०२१/ बखर २२: नासाचे पर्सेव्हेरन्स मंगळावर उतरले
१९ फेब्रुवारी २०२१
अंतराळात सात महिन्याच्या प्रवासानंतर नासाचे पर्सेव्हेरन्स हा रोव्हर मंगळ ग्रहावर सुरक्षित उतरला. पर्सेव्हेरन्स हा आजपर्यंतचा सर्वात मोठा आणि आधुनिक रोव्हर आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने हा रोव्हर मंगळावरील मातीमध्ये, दगडांमध्ये सजिवसृष्टीच्या अस्तित्वाचे पुरावे शोधणार आहे.
●●●

२०२१/ बखर २३: कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढला
२० फेब्रुवारी
महाराष्ट्रात कोरोना संसर्गाची तीव्रता पुन्हा वाढत चालली आहे. केरळ, पंजाब, छत्तीसगढ आणि मध्यप्रदेश या राज्यातही कोरोनाची रुग्ण संख्या हळूहळू वाढत चालली आहे.

निर्बंध कमी झाल्यामुळे लोक आता गर्दी करू लागले आहेत. चहाची दुकाने, हाॅटेल्स, रेस्टॉरंट, पर्यटन स्थळे, बीच, पार्क यासारख्या ठिकाणी लोक विनामास्क फिरत आहेत. कोरोनाची भीती नष्ट झाल्याचे चित्र देशभर बघायला मिळतेय.
●●●

२०२१/ बखर २४: मातृभाषेला कमी लेखू नका
२० फेब्रुवारी
आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनानिमित उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी खासदारांना पत्र पाठवले आहे. त्यात ते म्हणतात की, एखाद्या मातृभाषेला कमी लेखणे आणि इंग्रजी भाषा येणे म्हणजे कर्तृत्वाचे खोटं बिरुद मिरवण्याच्या मानसिकतेमुळे भारतीय भाषांचे अपरिमित नुकसान झाले आहे. मातृभाषेला तुच्छ लेखण्याची ही वृत्ती बदलण्याची गरज आहे. ते पुढे म्हणतात की, भारतीय भाषांचे संवर्धन, प्रसार, दैनंदिन जीवनात त्याचा सातत्याने जाणीवपूर्वक वापर करण्यासाठी व्यापक सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे.
●●●

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा