आज दिवाळी सण होता. मी सकाळी उठून कामावर जाण्यासाठी स्नान (अभ्यंग नव्हे) केले. मेट्रोत बसण्याआधी मल्लूच्या हाटलीत दाबून फराळ खाल्ले (तीन इडल्या, वाटीभर सांभर, तीन चार पळ्या चटणी वरून कपभर चहा) मग मेट्रो पकडून कामावर गेलो. चहूबाजूंनी शुभेच्छांचा वर्षाव चालू होता. पाकिस्तान पासून ते फिलिपिन्स पर्यंतची जनता शुभेच्छा देत होती पण आम्ही जसा काय राष्ट्रीय दुखवटा असल्या प्रमाने स्तब्ध होतो. चेहर्यावर कसलाच हावभाव नव्हते. व्हाट्सअप तर आज पार गळूनच गेला होता.
दूपारी छान चपाती कोंबोचा फडशा पाडला. देह ऑफिसात म्हणजे दुबईत होता पण आत्मा न जाने आरबी समुद्राच्या पैलतीरावर कोठेतरी घुटमळत होता.
संध्याकाळी घरी आलो. फुटपाथ वरून चलताना अनेक ईमारतीवर रोषणाई दिसत होती. घरी आल्यावर अंघोळ करून ग्रंथ पुजा उरकून घेतली. (ग्रंथ म्हणजेच आपली हक्काची दौलत. त्यात कोणी वाटेकरी नाही) दिवा पेटवायला पंती नव्हती तर वातीला कापूस (तीन वर्षे झाली गावी कापूसच पिकत नाही त्यामुळे वातीच्या पंचाती) मग जेवणाची लहानशी वाटी घेतली त्यात कान कोरण्यासाठी असलेल्या काड्याच्या कापसापासून वात बनवली. दिवा पेटवून पूजा पूर्ण केली (मनोभावे हात जोडले, ग्रंथासमोर डोके आपटले)
मग मोर्चा पोटोबा कडे वळला. वाटीभर भात शिजवला त्याला कशीबशी फोडणी देवीली. लालजरात चिली साॅस बरोबर खिचडी हा हा म्हणता कधी संपली कळालेच नाही.
भांडी आज घालावीत की उद्या यावर विचार मंथन चालू होते पण म्हणोलो सणासुदीचा घरात उगी र्हाडा नको. भांडी घासली चूळ भरली. खिडकीतून दूरवर कोठेतरी फटाके फोडल्याचा आवाज येत होता. तस माझ्या फोटात भात असूनही तोडीत होतं.
अंगावर गावाकडून आणलेली गोधडी कानावर कचकन आवळून झोपलो. त्याआधी दिवा विझल्याची खात्री केली. उगाच फायर अलार्म वाजयला नको. फटाक्यांचा अवाज अधूनमधून येतच होता. मी मात्र झोपण्याचा प्रयत्न करत होतो.
शुभ दिवाळी....
गूड नाईट
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा