उंच घे झोका
घेवू वेध भविष्याचा
मातीच्या कणाकणातून
अंकुर उगवू नवा
भूक ठेवू मोठी
खावू शिधा ज्ञानाचा
घामाच्या धाराधारातून
मोती पिकवू खरा
सूर मार तळाला
ठाव आणू परिश्रमाचा
प्रयत्नांच्या थराथरातुन
आनंदाचा पेटवू दिवा
सर करू शिखरे
स्वार्थ सोडू मनाचा
समाजाच्या चराचरातून
आग्रह धरू एकतेचा
मारू हाक मोठी
देवू साद प्रत्येकाला
गरीबीच्या घराघरातून
माणूस करू मोठा
- ©गणेश पोटफोडे
- ©गणेश पोटफोडे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा