गुरुवार, २५ डिसेंबर, २०२५

प्रा. दिलीप चौधर स्मृतिदिन


माझे मार्गदर्शक प्राध्यापक दिलीप सर यांचा आज द्वितीय स्मृतिदिन आहे. शेतीमातीशी कायम नातं जपणारा, सामाजिक बांधिलकी मनापासून निभावणारा आणि उच्च आचार-विचारांनी जगणारा माणूस अचानक आपल्या आयुष्यातून एक्झिट घेतो, हे आजही मन स्वीकारू शकत नाही.

शेती, जागतिकीकरण, अर्थव्यवस्था आणि राजकारण या विषयांवर आमच्यात नेहमीच सखोल चर्चा व्हायच्या. कधी मतभेद, वाद-विवादही व्हायचे; पण प्रत्येक वेळी त्यांनी मला मोलाचं आणि दिशादर्शक मार्गदर्शन केलं. विचारांना धार देणारा आणि प्रश्न विचारायला शिकवणारा असा तो गुरू होता.

नोकरी सांभाळूनही शेतात मनापासून राबणारा हा माणूस होता. शेतीवर त्यांचं विशेष प्रेम होतं. गावात सगळ्यात जास्त कापूस कोण पिकवायचा, तर तो मान फक्त दिलीप सरांकडेच जायचा.

त्यांनी अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांचं आयुष्य घडवलं. त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणलं, आत्मविश्वास दिला आणि नोकरी-धंद्याच्या वाटेवर उभं केलं.

आजही कधी कधी वाटतं — व्हॉट्सॲपवर त्यांचा एखादा संदेश येईल, अचानक व्हिडिओ कॉल येईल. दोन वर्षं झाली तरी त्यांच्या जाण्याचा विश्वास बसत नाही.
विनम्र अभिवादन 🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा